उभादांडा येथील श्री सागरेश्वर मंदिर

वेंगुर्ले- उभादांडा येथील सागरेश्वर किनार्‍यावर वेंगुर्ले शहरापासून अवघ्या सुमारे ३ कि.मी. अंतरावर श्री सागरेश्वराचे मंदिर असून हे पर्यटन स्थळ आहे. चारही बाजूंनी वाळूच वाळू असलेल्या सागरेश्वर या पुरातन मंदिरात जावून दर्शन घेवून पुढे होता येते.

मंदिराच्या आवारात गोड्या पाण्याची विहीर आहे. तसेच भाविकांसाठी छोटेखानी धर्मशाळा पण आहे. श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी व शनिवारी सागरेश्वर मंदिरामध्ये भाविकांची अलोट गर्दी होते. येथे महाशिवरात्रीला मोठा उत्सव होतो.

Scroll to Top