तालुक्यातील बागायतवाडा-उभादांडा येथील समुद्र किनार्या जवळ वसलेल्या श्रीदेव कोठारेश्वराचे श्वध्दास्थान मोठे आहे. ३०० शतकाचा इतिहास असलेले हे देवस्थान स्थित, शिवकालीन धान्य कोठार होते. वृक्षाखाली स्थापन झालेल्या या श्रीदेव कोठारेश्वराच्या मूर्ती सभोवती बागायतवाडी आणि पंचक्रोशीतील भाविकांनी मिळून ३ वर्षापूर्वी सुबक असे मंदिर उभारले आहे.
दरवर्षी तिथीप्रमाणे याठिकाणी होम, महपूजा, महाप्रसाद, भजन, आरती असा धार्मिक कार्यक्रम तसेच सांस्कृतिक कार्यक्रम सादर होतात. याव्यतिरिक़्त दैनंदिन पूजा- अर्चा धार्मिक विधीही नित्यनियमित होत असतात. श्रीदेव मानशीश्वर देवालयाच्या लगतच असलेले हे देवस्थानही भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मानशीश्वर देवाच्या जत्रोत्सवाच्या आदल्या दिवशी या श्रीदेव कोठारेश्वराचा जन्मोत्सव असतो. हे मंदिर उभारणीसाठी बागायतवाडीतील बागायतकर बंधुसह पंचक्रोशीतील भक्तांनी मोठे सहकार्य केले आहे.

